
नाशिक बातमी : कांदा अग्निडाग समारंभ ‘मुख्यमंत्र्यांना रक्तानं लिहलं पत्र’,Nashik News : नाशिकच्या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित अग्निडाग कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला असून गेल्या कित्येक दिवसापासून कांद्याचं करायच काय हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. लाल कांदा सध्या बाजारामध्ये येतोय. मात्र या कांद्याला कवडीमोल रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. अशातच नाशिकच्या एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना (Eknath Shinde) रक्ताने पत्र लिहत अग्निडाग कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.
